शिव दिनविशेष

शिव दिनविशेष

१  सप्टेंबर  १६६
 शिवरायांनी चौल ते बांधा हा प्रदेश स्वराज्यात आणला 

 सप्टेंबर १६७९
मुंबई येथे तातडीची बैठक घेऊन इंग्रजांनी ऐन्साइन ह्युजेस याच्या अधिपत्याखाली सैनिकांच्या ६ तुकड्या व तोफा बसवून ३ शिबाडे खांदेरी व भूमी यांच्या दरम्यान गस्त घालण्याकरता पाठवली याचे कारण बांधकाम सुरु झाल्यापासून थळच्या किनार्यापासून खांदेरीला रसद पुरवठा सुरु होता. 
इंग्रजांचे असे ठाम मत होते कि हे बेट  इंग्लंडच्या राजाचे आहे व यावर मराठ्यांनी हक्क सांगू नये. सकाळी ८ वाजता क्याप्टन ऐन्साइन ह्युजेस खांदेरी जवळ पोहचला पाहतो तर मराठ्यांनी खांदेरी बेटावर चढायच्या सर्व जागी ३ फुट उंच भिंती बांधून त्या बंद केल्या होत्या व मोक्याच्या जागी ५ ते ६ तोफा ठेवल्या होत्या, बेटावर बांधकाम जोरात चालू होते. या बांधकामामुळे इंग्रज अधिकारी जागे झाले. 

 सप्टेंबर १६७५
छत्रपती शिवरायांनी पारमाची तर्फे शिवथर येथे रामनगर पेठ वसवली. 

 सप्टेंबर १६७८
श्री कृष्ण जन्माष्टमी मागे पडली व श्रावण वाद्य एकादशीचा दिवस उजाडला, शिर्क्यांच्या वाड्यातील बाळंतपणीच्या दालनात बालबोल फुटला, कन्यारत्न आलं येसुबाई मासाहेब झाल्या ! संभाजीराजे आबासाहेब झाले,
धर्मवीर संभाजी राजे व महाराणी येसूबाईसाहेब यांनी शृंगारपुर येथील मुक्कामी "भवनिबाई" नावाचे कन्यारत्न प्राप्त जाहले. 

 सप्टेंबर १६५६
रायरी ताब्यात घेतल्यावर शिवरायांनी रायरीचे 'रायगड' असे नामकरण केले होते, रायरी हि जावळीच्या मोरे कडे होती ,
महाराजांनी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यानंतर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरी वर येउन बसला, राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा दिला अखेर काही महिन्यानंतर मोरे ला मारून राजांनी ६ मे  १६५६ रोजी हा किल्ला ताब्यात घेतला. 

 सप्टेंबर १६५९
सकल सौभाग्यसंपन्न सईबाई राणीसाहेब यांचे राजगडावर निधन झाले, संभाजी राजे अकाली पोरके झाले याचवेळी राजे अफझलखानाचा सामना करण्यासाठी प्रतापगडावर वास्तव्यास होते . 

 सप्टेंबर १६६५
संभाजी राजांच्या मनसबीचे फर्मान. 

 सप्टेंबर १६७५
शिवराय व सन्युअल ऑस्टिन यांची भेट. 

 सप्टेंबर १६६१
शिवरायांना कन्यारत्न प्राप्त जाहले व तिचे नाव ठेवले सकवारबाई पण कोणत्या राणीसाहेबांना प्राप्त जाहले हे अजून इतिहासाला माहित नाही. 

 सप्टेंबर १६७९
दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकर मार्फत "उंदेरी व खांदेरीचा" ताबा पुन्हा मिळवला. 



संदर्भ :- सह्याद्रीचे अग्निकुंड 
                ( सुरज थोरात )
              सह्याद्री प्रतिष्ठान 

posted under | 0 Comments
Newer Posts Home

वाचक

Designed by WebQuest. Powered by Blogger.

सह्याद्रि

Blog Archive

Followers


Recent Comments