शिव दिनविशेष

८ सप्टेबर १६६१
शिवरायांना कन्यारत्न प्राप्त जहाले

९ सप्टेबर १६७१
इंग्रजांच्या मुंबई येथील गवर्नरने त्याच्या साहेबाला शिवरायांच्या संदर्भात पत्र  लिहले, पत्रात तो म्हणतो " शिवरायांच्या हाती खांदेरी असने म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे ".

९ सप्टेबर १६८६
औरंगजेबाने आदिलशाही संपवली

१० सप्टेबर १६६६
शिवरायांनी रांगणा किल्ला जिंकला

११ सप्टेबर १६७९
दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजाबरोबरच्या लढाईसाठी मायनाक भंडारी च्या मदतीला खांदेरी येथे पोहचला, इंग्रजांची हंटर रिव्हेज व इतर ३ जहाजे खांदेरीला वेढा टाकुन उभी होती, दौलतखानने इंग्रज अधिकारी केग्विनचा पाडाव करुण मायनाक भंडारीला रसद पोचती केली व 'नागाव' ला पुन्हा रसद घेण्यासाठी गेला

१२ सप्टेबर १६६६
आग्र्याहून सुटका करून शिवाजी महाराजांचे त्यांच्या जिवलगा सहित राजगड येथे आगमन,
शिवराय व त्यांचे सहकारी संन्याश्याच्या वेशात राजगडी आले, त्यात प्रमुख होते निराजी रावजी व उर्वरित शिष्यगण.
या सर्वांनी औसाहेबाना भेटण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांच्या विनंतीला मान देऊन आऊसाहेब दर्शन घेत घेत महाराजांसमोर आल्या तेव्हा न राहवून आपल्या माय माउलीच्या पायावर अश्रूंचा अभिषेक केला आऊ साहेबाना अतिशय सुखद धक्का होता तो

१३ सप्टेबर १७२०
१७१८ मधले २ हल्ले फसल्यावर इंग्रजांनी आन्ग्र्याबरोबर तह केला पण १७२० मध्ये एका बाजूला बोलणी तर दुसर्या बाजूला लढाई करत ते 'घेरिया' कडे निघाले, मात्र आन्ग्र्यांची लाधैची तयारी बघून ते घेरिया सोडून देवगडावर हल्ला करायला सरकले.

१४ सप्टेबर १६७८
शिवराय नागापट्टण येथे मुक्कामी

१५ सप्टेबर १६७५
शिवराय व स्यमुअल ऑस्टिन यांची पुन्हा भेट  



                                                                                          संदर्भ :-  सह्याद्रीचे अग्निकुंड
                                                                                                             सुरज थोरात
                                                                                                          ८२३७३७०७६२



posted under | 0 Comments
Newer Posts Older Posts Home

वाचक

Designed by WebQuest. Powered by Blogger.

सह्याद्रि

Blog Archive

Followers


Recent Comments