बाबासाहेब पुरंदरे 

' शिवाजी महाराज ' हे दोन शब्द तुमच्या आमच्या मनाचे आणि तनाचे अविभाज्य घटक आहेत. अगदी जन्मापासून मरणापर्यंत या आपल्या राजाची साक्षात आठवण म्हणून त्याच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अशा , त्याच्या स्वत:च्या वस्तू , वस्त्रे , शस्त्रे , चित्रे , हस्ताक्षरे , पत्रे आणखी काही आज आपल्याला उपलब्ध आहे का ? असेल तर ते कोठेकोठे आहे ? ते सर्वसामान्य नागरिकाला विशेषत: तुमच्या आमच्या मुलांना पाहावयास मिळेल का ? निदान त्याची प्रकाशचित्रे तरी मिळतील का ? महाराजांची विश्वसनीय अस्सल नाणी कोणती ? त्यातील समकालीन अस्सल कोणती ? उत्तरकालीन पेशवाईतील शिवनाणी कशी ओळखायची ? इत्यादी कितीतरी कुतुहली प्रश्न आपल्याला पडतात. त्या सर्वांचीच उत्तरे चोख देता येत नाहीत. कारण त्याचे पुरावे उपलब्ध नसतात. पण जे काही आहे , ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा सगळ्या वस्तू वास्तूंना ' शिवस्पर्श ' असे नाव देता येईल. असे शिवस्पर्श आज किती उपलब्ध आहेत ?

महाराजांनी स्वत: जे काही हाताळले अन् वापरले असे आज नक्की काय काय आहे ? पहिली वस्तू म्हणजे त्यांची भवानी तलवार. या तलवारीबद्दल प्रचंड कुतुहल अन् तेवढेच प्रेम सतत व्यक्त होत असते. ही तलवार साताऱ्याच्या जलमंदिर राजवाड्यात श्रीमंत छत्रपती राजे उदयनमहाराज भोसले यांच्या खास व्यवस्थेखाली , अत्यंत सुरक्षित बंदोबस्तात ठेवलेली आहे. ही तलवार भवानी तलवारच आहे , हे सिद्ध करावयास पुरावे आहेत. ते पुरावे वेळोवेळी प्रसिद्धही करण्यात आले आहेत. येथे माझ्या मते या क्षणापर्यंत ही तलवार भवानीच आहे एवढेच निश्चित सांगतो. अन्य विश्वसनीय पुरावे येथून पुढे उपलब्ध झाल्यास विचार करता येईलच. निर्णयही घेता येईलच.

लंडन येथील बंकींगहॅम पॅलेसमध्ये छत्रपती महाराजांच्या खास शस्त्रालयातील एक तलवार राणी एलिझाबेथ यांच्या राजसंग्रहालयात आहे. प्रिन्स ऑफ वेल्स पदावर असताना इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड हे इ. १८७५ मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांना कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांनी भेटीदाखल ज्या मौल्यवान वस्तू दिल्या , त्यांत एक अत्यंत मौल्यवान आणि सुंदर अशी तलवारही दिली. या तलवारीचे नाव कोल्हापूर दरबाराच्या दप्तरखान्यांत ' जगदंबा ' म्हणून नमूद आहे. ही तलवार रत्नजडीत मुठीची आहे. त्यावर बहात्तर माणके आणि अगणित हिरे जडविलेले आहेत. या तलवारीची जी घडण आहे , त्याला फिरंग किंवा पट्टापान किंवा सडक किंवा सॅबर असे नावे आहे. ही तलवार शिवकालीन नक्कीच आहे. पण ती भवानी नाही. पण ती छत्रपती महाराजांच्या खास शिलेखानातील आहे. म्हणून असे वाटते की , हीही जगदंबा तलवार शककतेर् शिवाजी महाराज छत्रपती (इ. १६३० ते ८० ) यांनीही स्वत: वापरली असेल की काय ? तशी शक्यता असू शकते. म्हणूनच साताऱ्यातील असलेल्या भवानी तलवारीप्रमाणे करवीर छत्रपती महाराजांच्या शिलेखान्यात असलेल्या आणि सध्या बंकींगहॅम पॅलेस , लंडनमध्ये असलेल्या या जगदंबा तलवारीबद्दल तेवढेच प्रेम आणि भक्ती वाटणे हा आमचा सर्वांचा स्वभावधर्मच आहे. ही तलवार (जगदंबा) कोल्हापूर महाराजांची आहे. ती पुन्हा छत्रपती महाराज कोल्हापूर यांच्या राजवाड्यात परत यावी अशी सर्व जनतेचीच इच्छा आहे. ही जगदंबा तलवार बंकींगहॅम पॅलेसमध्ये अतिशय शानदार दिमाखात ठेवलेली आहे. (मी स्वत: ती पाहिली आहे) तशी आस्था आणि व्यवस्था ठेवण्याची थोडीफार सवय आम्हाला लागली तरीही खूप झाले.

शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले ? त्याचा वेध आणि शोध घेतला , तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते २४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले राजकीय व्यवहार तो पाहत असे. तो हुशार होता. तो प्रथम हित पाहत असे , ते आपल्या इंग्लंड देशाचे आणि इस्ट इंडिया कंपनीचे. त्याला इतिहासाचीही आवड होती. साताऱ्यातील वास्तव्यात मराठ्यांच्या इतिहासावर आणि त्यातल्यात्यात शिवकालावर लिहिण्याची त्याने आकांक्षा धरली आणि ती पूर्ण केली. त्याने लिहिलेला ' हिस्टरी ऑफ मराठाज ' हा गंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला , कालक्रमानुसार असलेला पहिलाच गंथ आहे. म्हणून त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो. तो अत्यंत सावध लेखक आहे. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध ठेवून आपले काम सुविधेने साधले. त्याने बहुदा याच काळात शिवाजीमहाराजांची वाघनखे प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेले होते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.

महाराजांची जी समकालीन चित्रे (पेन्टिंग्ज) समकालीन चित्रकारांनी काढलेली म्हणून आज उपलब्ध आहेत , त्यातील काही चित्रांत महाराजांचे हातांत पट्टापान तलवार म्हणजेच सरळ पात्याची तलवार म्यानासह दाखविलेली दिसते. तसेच पोलादी पट्टा हातात घेतलेलाही दिसतो. तसेच कमरेला कट्यार (म्हणजे पेश कब्ज) खोवलेलीही दिसते. पण महाराजांचा हा पोलादी पट्टा आणि कट्यार आज उपलब्ध नाही. तसेच त्यांची ढाल आणि हातावरचे संरक्षक दस्ते (म्हणजे मनगटापासून कोपरापर्यंत दोन्ही हातांचे संरक्षण करणारे , दोन्ही हातांची धातूंची वेष्टणे) आज उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे महाराजांचे पोलादी चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण आणि कापडी चिलखत आणि कापडी शिरस्त्राण होते. पण आज त्यातील काहीही उपलब्ध नाही.

याशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला , विटे , धनुष्यबाण , खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका , तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले) , कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुल यात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाचा आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना ' गोडे हत्यार ' असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यास हत्यारांना ' उडते हत्यार ' असे म्हणत. एकूण शिवस्पशिर्त हत्यारांबाबत सध्या एवढेच सांगता येते.







posted under | 0 Comments

रौद्र शंभू 


रायगडाच्या माथ्यावरुन कडाडला छावा..
जणु सह्यांद्रिच्या छातीत उसळला लाव्हा..
हैरान करी औरंग्याला त्याचा गनिमी कावा..
बलदंड ताकदीचा विर ऐसा ना कळले देवा..
घायाळ होई युध्दभुमी ऐसी तळपली तलवार..

थरथर कापे गनिम असा त्या नजेरेचा वार..
रक्त पाजे रणांगना होऊन शत्रुवर स्वार..
वार घेई छातिवर बोथट होई तलवारीची धार..
स्वराज्यासाठी रुळली ईथे बलिदानाची प्रथा..
झुकेल कसा छावा ज्याचा शिवछत्रपति पिता..
पत्करीतो शरण मृत्यु टेकवि माथा..
अजिंक्य पराक्रामाची जगी एकच हि कथा..

जय
जय
जय शंभु राजे



एक शम्भू कवी 




posted under | 0 Comments

धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे!

आपण सर्वास आषाढी ऐकादशी तर माहित असेल त्याच महत्व सुद्धा माहित असेल पण आपणास आषाढी पोर्णिमेचे म्हणजे गुरु पोर्णिमा हे माहित असेल पण आधीच्या आषाढी पोर्णिमाला शिवाजी महराज केवळ ६०० मावळ्यासोबत पन्हाळगडावरुन विशालगडाकडे निघाले होते.

पण त्यान्ची ही वाट सोपी नव्हती. पन्हाळगडा बाहेर सिद्दी जोहर ४०००० फ़ोज घेउन बसला होता. त्या नंतर त्या वेळच्या घोडखिन्डित बाजी प्रभु देशपान्डे यानी अतुलनीय साहस व पराक्रम गाजवला. मला अस वाटते की आपणास हे महीत असेल. ज्या वेळी बाजी महाराजा सोबत विशालगडा कडे कुच करत होते त्यास वेळी अजुन एक मावळा एक अतुलनीय शोर्य व धाडस करत होता.

तो मावळा म्हणजे शिवा काशिद. शिवा काशिद हा महाराजाचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ही शिवाजी महराजासारखिच होती. जर शिवा काशिदास महाराजाचे कपडे घातले तर नवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या. एक महाराजांजी आणी दुसरी शिवा काशिद. एक विशालगडाकडे व दुसरी सिद्धी जोहरकडे.

हे तर आपण जाणलच असेल की ४०००० च्या आत गेलेला शिवा काशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एक सामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचा राजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल.

धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे!

सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई

निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी

वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने

उन पावसाची न करता तमा फ़ोज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार

करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे

रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव

पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.

राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात
जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात

अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी

शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण
पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण

प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो
मरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो"

समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत

गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास



                                                                       सूरज बबन थोरात 

posted under | 0 Comments

भवानी तलवारीचे गूढ




छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे, हा एक मोठा गूढ प्रश्‍न आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून हा प्रश्‍न अधूनमधून चर्चेत येतोच, त्यावरून रान पेटते आणि मग तो पुन्हा बासनात जातो, असे घडताना दिसत आहे. इंग्लंडमध्ये बकिंगहॅम राजवाड्यात भवानी तलवार आहे, अशी एक समजूत आहे. लोकमान्य टिळकांनी ही तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करणारी एक कविता गोविंदाग्रजांनी (राम गणेश गडकरी) लिहिली होती. 1980मध्ये बॅ. अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, तर त्यांनी भवानी तलवार महाराष्ट्रात आणणारच अशी घोषणा करून मोठी मौज केली होती. त्यासाठी त्यांनी लंडनवारीही केली होती. तिकडून त्यांनी भवानी तलवार नाही आणली, पण तिचे चित्र तथाकथित चित्र मात्र आणले. यानंतर भवानी तलवार पुन्हा चर्चेत आली ती केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा. जून 2002मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी स्पेनच्या पाच दिवसीय भेटीवर गेले होते. त्यावेळी स्पेनमधील काही संशोधकांनी सांगितले, की शिवाजी महाराजांची भवानी तलवार स्पेनमधील तोलेदो या शस्त्रास्त्रे निर्मितीसाठी नावाजलेल्या शहरातील कारागिरांनी तयार केली होती. त्यावरून काही काळ धुरळा उडाला. मग तो विरून गेला.
बखरी आणि काव्यांनुसार साक्षात्‌ तुळजाभवानीने शिवरायांना तलवार दिली, ती ही भवानी तलवार. तुळजाभवानीने महाराजांना दर्शन दिले आणि "राजा, मी तुझी तलवार होऊन राहिले आहे' असे म्हणाली, असे "शिवभारत' या काव्यामध्ये नमूद आहे. महाराजांकडे अनेक तलवारी होत्या. त्यातील एक त्यांनी शहाजीराजांनी दिली होती. तिचे नाव त्यांनी "तुळजा' असे ठेवले होते. महाराजांच्या दुसऱ्या एका तलवारीचे नाव "जगदंबा' असे होते. महाराज भवानीचे भक्त होते. तेव्हा अन्य एखाद्या तलवारीला त्यांनी "भवानी' असे नाव दिले असेल. यात काही वाद नाही. वाद आहे तो हा, की सध्या ही तलवार कुठे आहे?
सुमारे नव्वदेक वर्षांपूर्वी मुंबईतील कॅप्टन बहादुर मोदी नावाच्या गृहस्थांनी भवानी तलवार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तशी एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, खान बहादुर पदमजी यांच्याकडे भवानी तलवार होती व ती त्यांनी डॉ. कूर्तकोटी यांना दिली. नंतर ती त्यांच्या स्वतःकडे आली. या तलवारीवर "छत्रपती शिवाजी' असे कोरलेले होते. नंतर उघडकीस आले, की तो मजकूर या पदमजी नावाच्या इसमानेच कोरलेला होता!

इंदूर-महू येथे असलेली तलवार हीच भवानी तलवार आहे व ती महाराजांनी छत्रसाल बुंदेल्याला दिली होती, असा दावा काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी केला होता. परंतु त्या तलवारीवर नंतर छत्रसालाच्या सेनापतीचे नाव आढळून आले!
असाच आणखी एक दावा केला जातो, की खेम सावंताकडून महाराजांना पोर्तुगीज बनावटीची तलवार मिळाली व तीच भवानी तलवार होय. वस्तुतः ही भाकडकथा आहे. खेम सावंत हा कोणी महाराजांचा एकनिष्ठ पाईक नव्हता. आदिलशाहीचा हा वतनदार, दगलबाज होता. महाराजांनी त्याचा बिमोड करण्यासाठी त्याच्या मुलखावर हल्ला केला होता. क्षणभर असे मानले, की शरणागती पत्करल्यानंतर त्याने महाराजांना जे नजराणे धाडले, त्यात ही पोर्तुगीज बनावटीची तलवारही होती, तरी महाराज त्या तलवारीवरील रोमन अक्षरे तशीच ठेवून तिला "भवानी' तलवार असे म्हणणार नाहीत.

रियासतकारांच्या म्हणण्यानुसार, रायगड्या पाडावानंतर औरंगजेबाच्या हाती भवानी तलवार लागली. ती त्याने शाहू महाराजांना त्यांच्या विवाहप्रसंगी भेट दिली. याचा अर्थ असा होतो, की भवानी तलवार सातारच्या छत्रपतींकडे आहे. सध्या ती उदयराजे भोसले यांच्या ताब्यात आहे. 1974 साली बाबासाहेब पुरंदरे यांनी मुंबईत "शिवसृष्टी' प्रदर्शन भरविले होते. तेव्हा त्यांनी सातारच्या राजघराण्यातील तलवार भवानी तलवार असल्याचे सांगून मिरवली होती. परंतु ज्येष्ठ इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी ही तलवार आधीच पाहिलेली होती. ती त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा डोळ्यांखालून घातली. खरे यांनी पुरंदरे यांना त्यावरील कोरीव मजकूर दाखवून ही तलवार भवानी नव्हे असे स्पष्ट केले. त्या तलवारीवर "सरकार राजा शाहू छत्रपती कदिम' असा उल्लेख होता.
1875 मध्ये इंग्लंडचे राजपूत्र, प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड इकडे आले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरच्या शस्त्रगारातील "तुळजा' व "जगदंबा' या दोन तलवारी नजर केल्या. यापैकी कोणतीही भवानी तलवार नव्हे. कोल्हापूरच्या राजघराण्याकडे अशी कोणती भवानी तलवार असती, तर ती त्यांच्या देवघरात पूजेत असती. ती त्यांनी कोणास नजराणा म्हणून दिली नसती. पण मुदलातच कोल्हापूर किंवा सातारा येथील राजघराण्यांच्या याद्यांमध्ये भवानी तलवारीचा उल्लेखही नाही.

बकिंगहॅम राजवाड्यातील दोन्ही तलवारी पोतुगीज बनावटीच्या आहेत. इतिहासकार वा. सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्या पाहून, त्यातील एकही भवानी तलवार नसल्याची खात्री दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना बकिंगहॅम राजवाडा व अन्य म्युझियम्समधील तलवारींची तपासणी करण्याची परवानगी नानासाहेब गोरे यांनी ते भारताचे इंग्लंडमधील हायकमिशनर असताना मिळवून दिली होती. त्या तलवारीवर अद्याप रोमन लिपीत "जे. एच.एस.' अशी अक्षरे आहेत. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या मते, ती जीजस ह्युमॅनन साल्वादोर या पोर्तुगीज नावाची अद्याक्षरे आहेत. ब्रिटिश म्युझियमेच डेप्युटी कीपर डग्लस बॅरेट यांनी, इंग्लंडमधील कोणत्याही म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही, असे 1969 साली कळविले होते.

भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहित नाही. ग. ह. खरे सांगतात, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कविच्या शंभुराजचरित्रात हिचा निर्देश आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर त्याचे तोंड बंद करणे शक्‍य नाही. तरीही इतिहास हे पुराव्याचे शास्त्र असल्याने आणि असा पुरावा त्या व्यक्तीस देता येत नसल्याने तञ्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता दाखविणार नाहीत.''

                                                                                    सूरज बबन थोरात


posted under | 0 Comments

वाघनखे 

शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले ? त्याचा वेध आणि शोध घेतला , तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते २४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले राजकीय व्यवहार तो पाहत असे. तो हुशार होता. तो प्रथम हित पाहत असे , ते आपल्या इंग्लंड देशाचे आणि इस्ट इंडिया कंपनीचे. त्याला इतिहासाचीही आवड होती. साताऱ्यातील वास्तव्यात मराठ्यांच्या इतिहासावर आणि त्यातल्यात्यात शिवकालावर लिहिण्याची त्याने आकांक्षा धरली आणिती पूर्ण केली. त्याने लिहिलेला'हिस्टरी ऑफ मराठाज'हा गंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला , कालक्रमानुसार असलेला पहिलाच गंथ आहे. म्हणून त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो. तो अत्यंत सावध लेखक आहे. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध ठेवून आपले काम सुविधेने साधले. त्याने बहुदा याच काळात शिवाजीमहाराजांच ी वाघनखे

प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेलेहोते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.
महाराजांची जी समकालीन चित्रे (पेन्टिंग्ज) समकालीन चित्रकारांनी काढलेली म्हणून आज उपलब्धआहेत , त्यातील काही चित्रांत महाराजांचे हातांत पट्टापान तलवार म्हणजेच सरळ पात्याची तलवार म्यानासह दाखविलेली दिसते. तसेच पोलादी पट्टा हातात घेतलेलाही दिसतो. तसेच कमरेला कट्यार (म्हणजे पेश कब्ज) खोवलेलीही दिसते. पण महाराजांचा हा पोलादी पट्टा आणि कट्यार आज उपलब्ध नाही. तसेच त्यांची ढाल आणि हातावरचे संरक्षक दस्ते (म्हणजे मनगटापासून कोपरापर्यंत दोन्ही हातांचे संरक्षण करणारे , दोन्ही हातांची धातूंची वेष्टणे) आज उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे महाराजांचे पोलादी चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण आणि कापडी चिलखत आणि कापडी शिरस्त्राण होते. पण आज त्यातील काहीही उपलब्ध नाही.
याशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला , विटे , धनुष्यबाण , खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका , तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले) , कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुलयात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाच आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना'गोडे हत्यार'असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यास हत्यार 'उडते हत्यार'असे  म्हणत.



                                                      सूरज बबन थोरात



posted under | 0 Comments

फिरंगोजी नरसाळा

शाहित्येखानाने स्वराज्यावर आक्रमण केल्यावर पुण्यात लालमहालात मुक्काम ठोकला.शाहित्येखानाच्या फौजा संग्रामदुर्गावर(चाकणचा भूईकोट किल्ला)चालून गेल्या.संग्रामदुर्गाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होता.फिरंगोजी महापराक्रमी वीर होता.किल्ल्यावर अवघे ३००-३५० मावळे होते.पावसाळा चालू होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती.मुघलांनी किल्यास वेढा घातला व किल्यावर तोफांचा भडिमार चालू केला.पण किल्या काही दाद देत नव्हता.मुघल सैनिक किल्याच्या बुरूजाजवळ आले की त्यांना गोफनगुंडे बसत.गोफनच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यांस रक्तबंबाळ केले होते.अवघ्या ३००-३५० मावळ्यासह फिरंगोजीनी किल्ला ५५ दिवस लढविला.मुघलांना किल्यावर प्रवेश करता येईना.अखेर त्यांनी तटापर्यंत भूयार खणून किल्ल्याचा तट उडविला.किल्याची एक बाजू उघडी पडली. किल्याजवळ हातघाईची लढाई झाली.
मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान टाळले.कारण महाराज म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा.माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.'फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजेंनी त्याना भूपाळगडाची किल्लेदारी,एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.


                                                                              सूरज बबन थोरात


posted under | 0 Comments

हिरोजी इंदलकर


    शिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ..
मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही .
शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर ... निष्ठा
माणस कशाच्या मोहने शिवाजी कडे आली....
विश्वास दिला राज्यानी"आपल राज्य उभा करायचा"मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ....
तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे..
ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती ....

हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यान कडे होता.
रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...

हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला ..
आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे .
किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.
आपला राहता वाडा , आपली जमिन विकली.
बायकोसह रायगडावर आला..
पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले . राज्याभिषे काच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ..
राज्याभिषे काच्या वेळी शिवाजी म्हणाले,"हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय."

त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान जुकवून म्हणाला ,"महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय...."
महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..
रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच् या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया .

महाराजाना कलेणा हे कसल मागण..
पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...
मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...????

आणि हिरोंजी उत्तर देतात,"राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच् या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्य ा वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."

                                                                          सूरज बबन थोरात




posted under | 0 Comments

बाजीप्रभु देशपांडे समाधी 

मी आणि माझा मित्र प्रवीण शिर्के  काही दिवसा पूर्वी विशाळगड वर बाजी प्रभू ची समाधी पाहण्यासाठी गेलो होतो .मनात फक्त  बाजी आणि त्यांच्या मावळ्यांच्या शोर्याचा पराक्रम डोक्यात होता .गड चढत चढत विचार येत होते की कशी असेल  बाजी प्रभू समाधी आणि आत्ता अधिकच उत्सुकता वाढतच होती. त्या पावन खिंडतील बाजीचे शब्द मनात गोधळू लागले होते.. 

राजे तुम्ही निम्मे मावळे घेवून विशाळ गड घाटा मी येथेच तुम्ही विशालगडा वर पोहचे पर्यंत हि खिड लढवतो

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशीदा जगाला पाहिजे, आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा 

 आम्ही गडावर जाताच क्षणी बाजी प्रभू समाधी समाधीची चौकशी केली कि ती कोठे आहे पण तेथील काहीनी  सागितले कि आम्हाला माहित नाही आणि काहींनी सागितले जरा पुढे आहे .असे करत करत आम्हाला १.३० ते २ तास लागले समाधी शोधण्यासाठी ती गडाच्या एका बाजूला एकाकी पडलेली  तिकडे कोणीही जात नाही  आणि फिरकत हि नाही पाहतो तर काय ज्या बाजी - फुलाजी बंधूंवर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा या बाजी - फुलाजी यांची समाधी अशी धूळ ,उन ,वारा खात खितपत पडली आहे .त्या समाधीवर एक फाटका रंग उडलेला भगवा धज्व मन भारावून गेले आणि अलगद डोळ्यातून एक अश्रू आला कि हि ती समाधी ज्या माणसाने शिवरायांसाठी सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि अखेर महाराज विशाळ गड वर पोहचल्यावरच प्राण सोडला  ह्याची हि अवस्था पाहून मनात आले कि कसला मराठी पणा आणि बाणा ज्या माणसाची  समाधी  ह्या  सोन्याच्या हव्या होत्या परंतु काही विचित्र चित्र नजरेस पडाले . आम्ही सर्वजन फक्त एकामेकाकडे पाहत होतो आम्हाला काहीच सुचत नव्हते.एक वाक्य मनात सारखे येत होते कि 
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशीदा जगाला पाहिजे आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा
       मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली  त्या बाजीच्या समाधी पुढे नतमस्त झालो आणि अलगद एक अश्रू  डोळ्यातून बाजीच्या समाधी वर पडला अंग भरून आले होते काय करावे हे समजत नव्हते शेवटी तेथील साफसफाई करू लागलो . काही वेळ चिंतन करून निराश मनाने माघारी फिरलो .

       आज आपलीच माणसे हि त्या विशाळ गड वर येतात पण बाजी समाधी कडे कोणीही फिरत नाही हि आजची वस्तुस्तीथी आहे . 


सूरज बबन थोरात 



posted under | 0 Comments

कोंडाजी फर्जंद

अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकार्यांनना ही सल बोलून दाखविली.

यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.

फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.

                                                                   सूरज बबन थोरात



posted under | 0 Comments

महादजी शिंदे

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द

पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठयांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगीरी केली.


वडगावची लढाई

१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजराथ पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखिल वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली

सिप्री येथील हार

ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅम नी ग्वाहलेर काबीज केले. वॉरन हेस्टींग नी महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटीशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखिल महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटीशांना आव्हान दिले. ब्रिटीशांच्या प्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटीशांच्या शिस्तबद्द सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटीशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.

                                                                           
                                                                            सूरज बबन थोरात


posted under | 0 Comments

  तानाजी मालुसरे


  छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते.


बालपण
    सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे.

कामगिरी

     छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
कोंढाणा किल्ला
          स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेंव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेंव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यानी ते लग्न अर्धे सोडले आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."
  गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करुन त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.
   तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला".अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आह
तानाजी मालुसरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.


                                 
                                                                   सूरज बबन थोरात



posted under | 0 Comments

कान्होजी जेधे


कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते.पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख,कान्होजी जेधे होते.ही देशमुखी त्यांना अदिलशाहने दिली होती.शिवाजीराजेंच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या अदिलशाहने फत्तेखान या सरदारामार्फत सन १६४८ साली शहाजीराजेंना अटक केली होती,तेव्हा कान्होजी व दादाजी लोहोकरे शहाजीराजेंसोबत होते.पुढे सर्वांची सुटका झाल्यावर शहाजीराजें अदिलशाहाच्या हुकूमानुसार बंगळूर या आपल्या नव्या जहागीरीच्या ठिकाणी निघाले असता त्यांनी कान्होजींना शिवाजीराजेंकडे पाठविले.

शहाजीराजें त्यांना बोलिले,"मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा,राजश्री सिवाजी राजेपण आहेत.त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो.तेथे इमाने शेवा करावी कालकला(बिकट प्रसंगी)तरी जीवावरी श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे(मरण पत्करावे)तुम्ही घरोबियातील मायेचे लोक आहा.तुमचा भरोसा मानून रवाना करतो(जेधे करीना)

शहाजीराजेंचे हे बोल म्हणजे आज्ञा मानून कान्होजीं शिवाजीराजेंकडे आले आणि म्हणाले,"महाराजांनी(शहाजी)शफत घेऊन साहेबांचे शेवेसी पाठविले.तो इमान आपला खरा आहे.खासा व पाच जण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ."(जेधे करीना)

याच सुमारास सन १६४९ साली अफजलखानाने जावळीवर स्वारी करावयाचे ठरविले व अदिलशाहाच्या  वतनदारांना फर्मान धाडिले व आपणा सोबत येण्यास सांगितले.खानाच्या फर्मानास घाबरून केदारजी व खंडोजी खोपडे खानास मिळाले.फलटणचे निंबाळकर पूर्वीपासून अदिलशाहसोबत होते.पण कान्होजीं जेधे आपले पाच पुत्रासह,सहकारी घेऊन राजापाशी आले आणि बोलिले,"यापुढे खस्त होऊ(मरण पत्करू)तेव्हा आमचे वतन कोण खावे आम्ही इमानास अंतर करणार नाही."यानंतर राजेंचा निरोप घेऊन कान्होजीं कारी या आपल्या गावी आले,व मावळातील समस्त देशमुखांना बोलावून शिवरायांची मदत करावयास सांगितले.
कान्होजी समस्त देशमुखांना म्हटले,"अफजलखान बेईमान आहे.कार्य जालियावरी नस्ते निमित्य ठेऊन नाश करील हे मर्हाडष्ट राज्य आहे.अवघियांनी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री..स्वामी सांनिध राहोन येकनिष्ठेने शेवा करावी यैश्या हिमतीच्या गोष्टी सांगितल्या."यावर सर्व देशमुखांनी राजेंकडे जाऊन आपले इमान व्यक्त केले.अडचणीच्या वेळी मावळातील सर्व देशमुखांना एकत्र करण्याचे काम कान्होजींनी करून राजांस मोठी मदत केली.

प्रतापगडाच्या लढाईत कान्होंजीचा पुत्र बाजी याने जीव महालासोबत राहून महाराजांचे प्राण वाचविले तर खानाचा पाडाव झाल्यावर कान्होजी आपल्या सहकार्यांेसोबत खानाच्या सैन्यावर तुटून पडला व हत्ती, घोडा, नौबती, नगारे, बिशादी, खजाना मिळविला.शिवाजीराजेंनी सन १६५५-५६ साली जावळीच्या मोर्यांास शासन केले,त्यावेळी कान्होजी,बांदल,सिलिंबकर व इतर देशमुखांनी त्यांना सहकार्य केले.
शाहित्येखानाविरूध्द लढण्यासाठी बाजी व चंदाजी हे कान्होजीचे दोन पुत्र राजेंसोबत लालमहालात गेले होते.राजें तोरणा,राजगडच्या बांधणीत गुंतले असताना,विजापुरी सरदार फत्तेखान याने अचानक पुणे परिसरावर हल्ला केला.राजे तातडीने कान्होजीस पुरंदर किल्ल्यावर आले.मराठ्यांचे गनिमाबरोबर धारोंधर युध्द जाहाले,अनेक मावळे मृत्युमुखी पडले,पराभव झाल्यास मराठ्यांचा ध्वज शत्रुच्या हाती लागू नये म्हणून बाजीने काही गनिमास यमसदनास धाडून ध्वज घेऊन पुरंदरावर आला.तेव्हा राजे निशाण सांभाळून आणले म्हणोन खूष जाहाले व त्यास सर्जाराई असा किताब दिला.पुढे बाजी,सर्जेराव या नावाने ओळखू लागला.
पुढे छत्रपती राजारामच्या कालखंडात सर्जेरावने आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबविरूध्द मावळातील देशमुखांना एकत्र केले.स्वराज्यासाठी जेधे घराण्याने मोठे योगदान केले आहे.


                                                                                 सूरज बबन थोरात



posted under | 1 Comments

नाव त्याचं 

 महाराष्ट्र माझा होता अंधारात

औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
 डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग

नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी

म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना

बसून त्यानं दख्खनच्या भूमींत
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची

नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”


एक शिवकवी 




posted under | 0 Comments

।। किल्ले वासोटा (व्याघ्रगड) ।।



इतिहास : 

या किल्ल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व होते. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. १६५६ मध्ये शिवाजीराजांनी जावळी प्रांताबरोबरच या वासोटा किल्ल्याचाही स्वराज्यात समावेश केला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे.
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत 'वसिष्ठ' हे नाव अपभ्रंश होऊन 'वासोटा' झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत 'वसंतगड' या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोटा बखरीवरून शिवरायांनी जावळी
विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोटावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

सह्याद्रीची मुख्यरांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते . या जावळी खोऱ्यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरु होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने गेल्यावर आपण पूर्वेकडील बाजूस पोहोचतो. या बाजूने दिसणारा शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते.

गडावर कसे जाल :

वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जाऊ शकतो.
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.

राहण्याची सोय:  राहण्याची सोय नाही.

पाण्याची व जेवणाची सोय : स्वतःच करावी.

जाण्यासाठी लागणारा वेळ: साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो.


                                                                           सूरज बबन थोरात



posted under | 0 Comments

शिवाजी महाराजांवरील कविता


टेकूनी माथा जया चरणीमी वंदन ज्यासी करितो...नित्यारोज तयांचेनवे रूप मी स्मरितो...

न भूतो न भविष्यती ऐसे ची होते माझे शिवछत्रपती...जन्मले आई जिजाऊ उदरी पावन झाली अवघी शिवनेरी...

ऐकत असता पोवाडा सदरी त्यात वर्णिली राणी पद्मिनी...रजपूत राणी सुंदर विलक्षणी कैद झाली मोघल जनानखानी...

चरचर कापले हृदय शिवरायांचे डोळ्यात दाटले अश्रू संतापाचे...कडाडले शिवरायsssआम्ही आहो वंशज रामरायाचे दिवस भरले आता मोघलांचे...

ज्याची फिरेल नजर वाकडी आईबहिणीकडे....त्याच क्षणी शीर मारावे हुकुम घुमला चोहीकडे...

काबीज करता कल्याण-भिवंडी अमाप आला हाती खजिना...वेळ न दवडिता सरदारांनी सादर केला एक नजराणा...

कल्याण सुभेदाराची स्नुषा विलक्षण सुंदर...उभी होती राजांपुढती झुकुवूनी घाबरी नजर...

धीमी पाऊले टाकीत राजे तिज जवळी आले...रूप पाहुनी विलक्षण सुंदरराजे पुढे वदले....

जर का आमच्या मांसाहेबइतक्या सुंदर असत्या.....आम्ही तयांचे पुत्र लाडके असेच सुंदर निपजलो असतो....

वंदन तुजला शतदा करतो धन्य तू शिवराया....स्त्री जातीचा मान राखुनीतूच शिकविले जगाया....!


                                                                                           एक शिवकवी




posted under | 0 Comments

शिवरायांचे खासगी आयुष्य


आपल्या सगळ्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल खुप कुतुहल असतं. शिवाजी महाराज स्वभावने कसे असतील, लढायांव्यतिरीक्त त्यांचं आयुष्यं कसं असेल, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. शिवछत्रपतींविषयीच्या अस्सल साधनांतून यातल्या काही प्रश्नांची उत्तरे पुर्ण स्वरूपात नाही, पण अंशतः शोधता येतात...शिवाजी महाराजांच्या स्वभावाविषयी बखरींतून अन् पत्रांतून काही अंदाज बांधता येतात. ते असे की, शिवाजी महाराज स्वभावाने शांत पण तितकेच उग्र होते. विशेषतः भडकले म्हणजे कोणालाही आवरता येणार नाहीत असे. इंग्रजांचे शासन हे अतिशय शिस्तप्रिय होते असे बोलले जाते, परंतू महाराजांचे शासन हे त्याहूनही शिस्तबद्ध, काटेकोर आणि अतिशय स्पष्ट होते. महाराजांच्या शिस्तबद्धतेची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. शिवाजी महाराजांच्या लहानपणी जिजाबाई आईसाहेबांच्या रांझे गावातील बाबाजी बिन भिकाजी गुजर या पाटलाने एका स्त्रिवर बदअंमल म्हणजेच बलात्कार केला. हे समजताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब त्याला पकडून आणून त्याचा चौरंगा करण्याचा हुकूम सोडला. चौरंगा म्हणजेच, कोपरापासून दोन्ही हात आणि गुढघ्यापासून दोन्ही पाय तोडणे ! पुढे अफजलखान स्वारीच्या वेळी मावळातील सारे देशमुख महाराजांच्या बाजूने लढले, पण उत्रवळीचा खंडोजी खोपडे देशमुख मात्र वतनाच्या हव्यासापोटी खानाला जाऊन मिळाला. पुढे महाराजांनी खानाला मारले, पण खंडोजी मात्र पळाला. तो अतिशय घाबरलेला होता. आपले जावई हैबतराव शिळमकर यांच्यामार्फत त्याने कान्होजी नाईक जेधे देशमुख यांच्याशी गुप्त बोलणे लावले. शेवटी कान्होजींनी खंडोजीसाठी महाराजांकडे शब्द टाकला. कान्होजीराजांसारख्या ज्येष्ठाचा शब्द महाराजांनीही मानला आणि खंडोजीला अभय दिले. एके दिवशी खंडोजी महाराजांकडे मुजरा करायला आला असता महाराजांनी एकदम त्याला पकडण्याचा आदेश दिला. खंडोजीला जेरबंद करण्यात आले. त्याचा डावा हात आणि उजवा पाय कलम करण्यात आला. मग महाराजांनी खंडोजीला अभय दिले होते ना ? तरीही शिक्षा का केली ? इथेच खरे शिवाजी महाराज समजतात ! त्यांनी खंडोजीला जिवाचे अभय दिले परंतू शिक्षा केली कारण लोक म्हणतील की स्वराज्यात कोणताही गुन्हा केला तरी चालतो, फक्त कान्होजी जेध्यांसारखा वजनदार वशिला हवा बस्स ! तर तसे होणे नाही...राज्याभिषेकाच्या आधी, १५ एप्रिल १७३३ रोजी, सरनौबत प्रतापराव गुजर यांनी विजापूरचा सरदार बहलोलखान पठाण शरण येऊन हातात आला असतानाही त्याला मोकळे सोडून दिले. परंतू प्रतापरावांनी ही फार मोठी चूक केली होती. कारण महाराजांनी त्यांना स्वारीवर निघतानाच महाराजांनी त्यांना बजावले होते, “ जो कोणी सरदार- सेनापती येईल त्याला शक्य तोवर जिवंत कैद करा. अगदीच जमलं नाही तर बुड्वा, मारा !”. पण प्रतापरावांनी त्याला जिवंत मोकळा सोडून दिला. शत्रूवर कधीही भरवसा ठेवायचा नसतो. बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालून आल आणि येताना पूर्वीपेक्षा दुप्पट सैन्यासह ! महाराजांना हे पाहून फार राग आला. रागाच्या भरात त्यांनी प्रतापरावांना एक खरमरीत पत्र लिहीले, “ सल्ला काय निमित्य केला ? सल्ला करण्याचा अधिकार तुमचा नव्हे ! तो अधिकार आमचा व राजमंडळाचा. तुम्ही स्वतःस सेनापती म्हणवता मात्र केलीत ती फक्त शिपाईगिरी. आता बहलोलखान हरघडी येतो, तरी त्यास गर्देस मेळविल्याविना आम्हांस रायगडी तोंड दावू नये ! ”. महाराजांचा खरा राग बहलोलखानावर होता, पण महाराज आपल्यावरच नाराज झाले आहेत असे प्रतापरावांना वाटले. लवकरच महाराजांचा राज्याभिषेक होता. अशा वेळी रायगडावर अष्टप्रधानांतील सात प्रधान उपस्थित राहणार होते, पण सरसेनापती मात्र तेथे नसणार होते. म्हणून शेवटी सूडाच्या भावनेनी पेटलेल्या प्रतापरावांनी अवघ्या सात सैनिकांच्यानिशी गडहिंग्लज-नेसरीच्या जवळच असणार्याप बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला चढवला. चाळीस हजारांच्या फौजेवर अवघे सात जण तुटून पडले. शेवटी व्हायचं तेच झालं, प्रतापराव मारले गेले. शिवाजी महाराजांना प्रतापरावांच्या मरणाचा फार मोठा धक्का बसला. त्यांचं मन कळवळलं. आपल्या केवळ एका पत्रामूळे प्रतापरावांनी आत्महत्या केली होती. महाराजांनी प्रतापरावांच्या कुटूंबाचं सांत्वन केलं. प्रतापरावांच्या मुलाला, नागोजी उर्फ शिदोजी बिन कुड्तोजी गुजराला त्यांनी सिंहगडासारख्या महाबलाढ्य किल्ल्याची किल्लेदारी दिली. पुढे प्रतापरावांच्या मुलीचा, जानकीबाई हीचा विवाह आपले धाकटे पुत्र राजाराम यांच्याशी लावून दिला. पण याच नागोजी उर्फ शिदोजी गुजराने पुढे एक चूक केली. जेजूरीच्या घडश्यांना चिंचवडकर देवांच्या सांगण्यावरून सिंहगडावर कैदेत डांबले, तेव्हा शिवाजी महाराजांनी नागोजीला सख्त ताकीद दिली. त्यावेळेस त्यांनी त्याला सहानुभूती दाखवली नाही. शिवाय चिंचवडकर नारायण देवांनाही त्यांनी ठणकावीले, ‘तुमची बिरदे आम्हांस द्या, व आमची बिरदे तुम्ही घ्या !’ म्हणजे तुम्ही राज्यकारभार करा, आम्ही तुमच्या जागी चिंचवडास जाऊन धुपारत्या करत बसतो !महाराज हे अतिशय कलाप्रिय होते. शाहीर अज्ञानदासासारख्या आणि यमाजींसारख्या शाहीरांकडून ते अनेक पोवाडे ऐकत असत. केशव पंडित, कविंद्र परमानंद नेवासकर, यांसारख्या महापंडितांकडून विविध विषयांवर ज्ञान घेवून त्यांच्याबरोबर चर्चाही करत असत. मोकळ्या वेळात अनेक सवंगड्यांबरोबर, शास्त्री-पंडितांबरोबर आणि कलावंतांबरोबर उठता-बसता महाराजांचे मन फुलत गेले आणि त्यांची बुद्धीही समृद्ध होत गेली. महाराजांच्या गडकोट बांधणी, न्यायनिवाड्यांवरून, पत्रांवरून त्यांचा राज्यशास्त्रावर, व्यवहारशात्रावर, खगोलशास्त्रावर, वास्तुशास्त्रावर इतिहास-पुराणांवर आणि परमार्थावर किती अभ्यास होता हे कळून येते. मराठी भाषा ही संस्कृत भाषेची धाकटी बहीणच आहे. त्यामुळे महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून ‘राज्यव्यवहारकोश’ या ग्रंथाची निर्मिती केली. राज्यव्यवहारतल्या पेशवे, सुरनिस, मुजुमदार, सरनौबत, डबीर अशा शब्दांना पंतप्रधान, पंतसचिव, सरसेनापती, पंतअमात्य, पंतसुमंत अशी अस्सल मराठी नावे दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझा मराठाची बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके, मेळविन ॥’ अशा शब्दात गौरव केला. पण नंतर मराठी भाषा हळूहळू लयाला जात चालली होती. संत नामदेव, संत एक्नाथ, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या अमृतवाणीतून मराठीचे काही झरे पाझरत होते. शिवाजी महाराजांनी मराठीला एक नवी संजिवनी देण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या पूर्वीच्या पत्रांच्या सुरवातीला लिहिण्यात येणारा ‘मशहुरूल अनाम, अजरख्तखाने, वजारतमाब..’ असा मायना शिवाजी महाराजांनी कायमचा बदलून त्याठिकाणी ‘अखंडीत लक्ष्मी अलंकृत, सकळ गुणालंकरण, राजश्रीया विराजीत, विश्वांसनिधी..’ अशी अस्सल मराठी विशेषणे लावयला सुरुवात केली.शिवाजी महाराज स्वभावने खेळकरही होते. आपल्या समोर शिवाजी महाराजांची मूर्ति उभी राहते ती अंगात चिलखत घातलेली, डोक्यावर शिरस्त्राण असलेली, पाठीवर ढाल आणि कमरेला भवानी तलवार अडकवलेली ! पण हा महाराजांचा युद्धवेश होता. इतर वेळेस महाराजांचे कपडे अगदी साधे असत. गळ्यात मोजकेच अलंकार आणि कुलदेवता भवानीदेवीच्या कवड्यांची माळ. महाराजांना दोन पुत्र व सहा कन्या होत्या. महाराज त्यांच्याशी गप्पगोष्टी करण्यात व आपल्या राण्यांशी बोलण्यातही वेळ व्यतित करत असत. महाराजांची आजपर्यंत अस्सल अशी सात चित्र सापडली आहेत. ती चित्र द्विमितीय (प्रोफाईल) आहेत. पण या सर्व चित्रांतील शिवाजी महाराजांच्या मुखावर सूक्ष्म असं स्मितहास्य पसरल्याचं दाखवण्यात आलं आहे. जसं महाभारतात भगवान श्रीकृष्णाच्या चेहर्यारवर असतं. असे होते शिवाजी महाराज !आता शिवाजी महाराजांच्या लढायांव्यतिरिक्तच्या रोजच्या दिनचर्येबद्दल पाहू. महाराज वर्षातले बाराही महिने लढायला जात नसत हे तर उघडच आहे. अशा वेळी त्यांचा मुक्काम शक्य तोवर राजधानीवरच असे. स्वराज्याच्या सुरूवातीपासून इ.स. १६७२ पर्यंत राजगड हीच राजधानी होती. नंतर महाराजांनी राजधानीची जागा बदलून ती रायगडावर नेली. या काळात ते स्वराज्यातील इतर मुलकी कारभार पाहत असत. किल्ल्यांना वेळोवेळी भेटी देऊन त्यांच्या डागडुजीसंबंधी आज्ञा देणे, किल्ल्यांवरच्या सरदारांच्या नियुक्त्या करणे, किल्ल्यावर आणि फौजांना वेळच्या वेळी तोफा, दारुगोळा तसेच धान्यसाठा पुरवणे अशा अनेक कामांवर या मधल्या काळात देखरेख करावी लागत असे. महाराज पहाटे लवकर उठून स्नान आणि नित्याच्या स्फटीक शिवलिंगाची पुजा करत असत. नंतर आईसाहेबांचं दर्शन घेऊन, त्यांच्याशि बोलून गडावरच्या सदरेवर बसून न्यायनिवाडे, तंटे सोडवून लोकांचे प्रश्न सोडवले जात असत. बाळाजी आवजी चित्रे चिटणीसांना महाराज पत्राचा आशय सांगत असत. दुपारचे भोजन झाल्यानंतर वामकुक्षी घेतल्यानंतर महाराज गडाचा फेरफटका मारायला जात असत. रायगडावर असताना महाराज सायंकाळी श्री जगदिश्वराच्या दर्शनाला जात असल्याच्या नोंदी मिळाल्या आहेत. रात्रीच्या जेवणानंतर ते पुन्हा सदरेवर येत असत. या वेळी बाळाजी आवजी चिटणीसांनी तयार केलेल्या पत्रांवर नजर टाकून महाराज त्यांना पत्रातील काही गोष्टी सुचवत असत, आणि नंतरच ते पत्र पाटवण्याची आज्ञा दिली जात असे. त्यानंतर महाराज झोपायला जात असत. महाराजांच्या पदरी पंताजी गोपिनाथ बोकील नावाचे एक हुशार ब्राह्मण कारभारी होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी खानाला वेळीवेळी झुकवून प्रतापगडच्या पायथ्याशी आणण्याचे महत्वाचे कार्य याच पंताजीपंतांनी केले होते. मुळात ते महाराजांचे वकीलच होते, पण अशा या पंतांबद्दल एका पत्रात म्हटलय, ‘पंताजी तो काका, त्यांचा मायना ऐसा, की आऊसाहेबांच्या संगतीस बैसोनु चौसर खेळावा’. महाराजांनाही चौसर म्हणजेच सारीपाट आवडत असे...तर असे होते शिवाजी महाराज... महाराजांबद्दलच्या काही नोंदी आणि इतिहासकारांनी केलेल्या संशोधनातून, आणि अस्सल साधनांच्या वाचनातून ही माहिती संकलीत करून आपणापुढे मांडली आहे. काही त्रुटी अथवा चूक झाली असल्यास क्षमस्व.. बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.



                                                                                          सूरज बबन थोरात





posted under | 0 Comments

रायगड (किल्ला)



नाव                                      रायगड (किल्ला)
उंची                                      ८२० मीटर/२७०० फूट
प्रकार                                     गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी                     सोपी
ठिकाण                                    रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव                    रायगड
डोंगररांग                                    सह्याद्री
सध्याची अवस्था                    व्यवस्थित
रा
यगड किल्ला हा तत्कालीन लष्करी दृष्टीने अभ्यास करण्यासारखा किल्ला आहे. एखाद्या ताटात भाताची मूद ठेवावी तसा हा सर्व बाजूंनी अलिप्त असा डोंगर आहे. रायगड सह्यादीचा पराक्रमी पुत्रच आहे. रायगडाची प्रत्येक दिशा केवळ अजिंक्य आहे. भिंतीसारखे ताठ सरळ कडे पाहिले की , असं वाटतं , हा गड आपल्या अंगावर येतोय. पावसाच्या दिवसांत अन् त्यातल्या त्यात आषाढी पावसांत रायगड चढून जाणं हा एक अघोरी आनंद आहे. आषाढी ढगांची फौज गडाला गराडा घालून तांडव करीत असते. कधीकधी त्यातच वादळ घुसते अन् मग होणारा ढगांचा गडगडाट आणि विजांचाही कडकडाट आपण कधी अनुभवला आहे का ? वेळ दिवस मावळण्याची असावी , हे सारं थैमान सुरू झालेलं असावं अन् आपण गडावरच्या नगारखान्याच्या उत्तुंग माथ्यावर उभे असावं.

रणवाद्यांचा बेताल कल्लोळ , शिंगतुताऱ्यांचा आणि शंखांचा अचानक आक्रोश , रुदवीणांच्या तारा तुटाव्यात असा विजांचा सणाणत सणाणत उठणारा चित्कार पावसाच्या भयंकर वर्षावात डोळे उघडता येत नाहीत पण उघडले तर अवतीभवतीचा तो महाप्रलय कल्लोळ भयभयाट करीत आपल्याला गदागदा हलवत असतो. तो प्रलयंकाल , महारुद , क्षुब्ध सहस्त्रशीर्ष , दुगेर्श शिवशंकर आणि सर्व संहारक चंडमुंडभंडासुरमदिर्नी , उदंडदंड महिषासुरमदिर्नी महाकालिका दुर्गाभवानी भयंकर रौद तांडव एकाचवेळी करीत आहेत असा भास व्हायला लागतो. कभिन्न अंधार वाढतच जातो. रायगड हे सारं तांडव आपल्या खांद्यावर आणि मस्तकावर झेलीत उभा असतो. अन् त्याही भयानक क्षणी आपल्याला वाटायला लागतं , अर्जुनाला दिसलेलं कुरूक्षेत्रावरचं ते भयप्रद दर्शन यापेक्षाही किती भयंकर असेल!

असा हा पावसाळ्यातला रायगड , कोण जिंकायला येईल ? अन् बिनपावसाळ्यातला रायगड तरी ? तेही अशक्यच. शिवाच्या भोवती तांडव करणाऱ्या त्याच्या भूतप्रेत , पिशाच्च , समंधादि भयंकर शक्ती मावळ्यांच्या रुपानं रायगडावरती असायच्याच ना?

अशा रायगडात प्रवेश करण्याची कोणा दुष्मनाची हिंमत होती ? रायगडात प्रवेश करणं शत्रूला अशक्य होतं. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच शत्रूला रायगडावर प्रवेश मिळणं अशक्य होतं.

या रायगडावर शिवाजीमहाराजांनी राजधानी आणली. हिरोजी इंदुलकरासारखा कुशल बांधकामगार महाराजांनी गडावरच्या तटाकोटाबुरुजांसाठी आणि अन्य बांधकामांसाठी नामजाद केला. हिरोजी कामाला लागला. रायगडाच्या अंगाखांद्यावर श्रावणातल्या गोकुळासारखं बांधकाम सुरू झालं. गडाचे कडे आणखी अवघड करण्यासाठी सुरुंगांच्या बत्त्या शिलगावल्या जाऊ लागल्या. सुरुंगांचे पडसाद दाही दिशांस घुमू लागले. महादरवाजा , चित्ता दरवाजा , नाणेदरवाजा , वाघ दरवाजा अन् अवघड सांदीसापटीत बांधलेला चोरदरवाजाही अंग धरू लागला. तीन मनोरे रूप घेऊ लागले. नगारखाना , सातमाडी महाल , पालखी दरवाजा , मेणा दरवाजा , शिरकाई भवानीचं देऊळ , कुशावर्त तलाव , गंगासागर कोळंब तलाव पाण्याने भरू लागले. कमीजास्त चाळीस बेचाळीस दुकानांची दोरी लावून सरळ रांग उभी राहिली. मधे रस्ता , समोर दुसरी रांग. जगदिश्वराचं भव्य मंदिर उभं राहिलं. असा रायगड पगडीवरच्या कलगीतुऱ्यांनी अन् नऊ रत्नांच्या फुलदार जेगो चौकड्यांनी सजवावा तसा हिराजीने सजवला.

केवळ राजधानीचा किल्ला म्हणून तो सुंदर सजवावा एवढीच कल्पना रायगडच्या बांधणीबाबतीत नव्हती. तर एक अजिंक्य लढाऊ किल्ला म्हणून गडाचं लष्करी महत्त्व महाराजांनी आणि हिराजीनं दक्षतापूर्वक लक्षात घेतलं आहे. गडावरच राजघराण्याचं वास्तव्य राहणार असल्यामुळे राजस्त्रियांची राहण्याची व्यवस्था हिराजीने खानदानी पडदा सांभाळून केली. या विभागाला बादशाही भाषेत म्हणत असत , ' झनानखाना ' किंवा ' दरुणीमहाल ' किंवा ' हरमखाना '. पण रायगडावर या कौटुंबिक राजवाड्याला म्हणत असत ' राणीवसा ' या राजकुटुंबाच्या विभागात प्रवेश करण्याकरिता स्त्रियांसाठी दक्षिणेच्या बाजूस एक खास दरवाजा बांधला. त्याचं नाव मेणादरवाजा. बारद्वारी आणि बाराकोनी उंच झरोक्याचे दोन मनोरे गडावर बांधले या मनोऱ्यात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी कारंजी केली. भिंतींशी लोडतक्के ठेवून सहज पंधरा- सोळा आसामींनी महाराजांशी गोष्टी बोलण्याकरता वा राजकीय चर्चा करण्याकरता बसावं , अशी जागा मनोऱ्याच्या दोन्ही मजल्यांवर ठेवली आहे.

दिवे लावण्याकरता सुंदर कोनाडे आहेत. झरोक्यांवर पडदे सोडण्याकरता गोल कड्याही ठेवल्या आहेत. आबदारखाना , फरासखाना , शिलेखाना , जिन्नसखाना , दप्तरखाना , जामदारखाना , मुदपाकखाना इत्यादी सारे महाल , दरख आणि कोठ्या गडावर बयाजवार होत्या. रात्री सगळीकडे दिवेलागण व्हायची. नगारखाना कडकडायचा. सनईचे सूर कोकणदिव्याला साद घालायचे. गडाचे सारे दरवाजे कड्याकुलुप घालून बंद व्हायचे. तोफ उडायची. गस्तीच्या पाहरेकऱ्यांच्या आरोळ्या लांबून लांबूनही उठायच्या. मशाली पेटायच्या. अन् सारे व्यवहार तेवढ्या प्रकाशात गडावर चालायचे. देवघरात अन् राजवाड्यात उदाधुपाचे अन् चंदनाचे सुगंध दरवळायचे. अन् देवघरात जगदंबेची आरती निनादायची. असा रायगड डोळ्यापुढं आला की मन फार सुखावतं. आजचा उद्ध्वस्त भकास आणि आम्ही लोकांनीही सिगरेटची थोटकं , दारुच्या रिकाम्या बाटल्या , अन् खरकटे प्लॅस्टिकचे कागद आणि पिशव्या अस्ताव्यस्त फेकून अन् ठिकठिकाणी भिंतींवर आपली नावं लिहून विदुप केलेला गड पाहिला की , स्वत:च्याच मनाला सुरूंग लागतो. त्याच्या चिंधड्या उडतात. अन् वाटतं , ' तुझ्या विछिन्न रूपाला , पाहुनि फाटतो ऊर…

Ø भौगोलिक स्थान
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १७ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवाजीचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.

Ø इतिहास
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.
Ø सभासद बखर म्हणते
“राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर.

Ø शिवराज्याभिषेक
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.
Ø कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की
“शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरूवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ.स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.”

Ø गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
२. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
३. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी लावला जातो अशी गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
५. महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विा व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
६. चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
७. हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
८. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
९. स्तंभ : गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
१०. पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
११. मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
१२. राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
१४. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
१५. नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
१६. बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरुन आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.
१७. शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.
१८. जगदीश्र्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे - श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्र्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
१९. महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.
२०. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.
२१. वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
२२. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरुन टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी
२३. हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

Ø रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेलो, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वार्‍याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणार्‍याला जाणवते.
शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते.

गडावरील राहायची सोय                 गडावर रहायची सोय आहे.
गडावरील खाण्याची सोय               गडावर खाण्याची सोय आहे पण स्वत:च्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे.
गडावरील पाण्याची सोय                 पाण्याचे अनेक तलाव गडावर आहेत. पाणी मुबलक.
गडावर जाण्याच्या वाटा                   गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. १. पायवाट २. पाळणा
जाण्यासाठी लागणारा वेळ              पायथ्यापासून चालत गेलात तर अंदाजे १ तास पाळण्याने गेलात तर ५ मिनिटे.



रायगडची पायथ्यापासूनची उंची २२५० फूट आहे आणि गडाचा महादरवजा १८५० फुटांवर बांधलेला आहे. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून, एक ७५ फुट उंच तर दुसरा ६५ फुट उंच आहे.‘सर्पाकृती’ बांधकाम असलेल्या या मार्गाची रूंदी सुरवातीला १६ ३/४ फूट व आत शिरेपर्यंत फक्त ८ १/२ फुट आहे.  

Ø रायगडचे वाचन
रायगडची पायथ्यापासूनची उंची २२५० फूट आहे आणि गडाचा महादरवजा १८५० फुटांवर बांधलेला आहे. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून, एक ७५ फुट उंच तर दुसरा ६५ फुट उंच आहे.‘सर्पाकृती’ बांधकाम असलेल्या या मार्गाची रूंदी सुरवातीला १६ ३/४ फूट व आत शिरेपर्यंत फक्त ८ १/२ फुट आहे. आणि म्हणूनच कितीही मोठया संख्येने आलेल्या शत्रूला महाद्वारात प्रवेश करताना दोन दोन किंवा तीन तीन च्या गटापेक्षा जास्त संख्येनी आत शिरणे शक्यचं नाही. या बुरूजाच्या, तटबंदीच्या भिंतीची जाडी २ फुटांपासून ४ फुटांपर्यंत आहे. बांधणी शास्त्राचे विशेष सांगायचे तर ते असे, की महादरवाजासमोर आपण जाऊन पोहचलो तरीही, दरवाजा कुठेच दिसत नाही. दर्शन होते ते फक्त महाकाय बुरूजांचे शत्रुला बुरूजांना समोर घालून दरवाजा बांधावा असा ‘आज्ञापत्रात’ उल्लेख आहे. ’किल्ला’ हा शब्द उच्चारल्याबरोबर कुणाच्याही डोळयासमोर प्रथम ‘बुरूज’ उभा राहतो. सिंधु दुर्गाच्या बांधकामात ४२ बुरूज आहेत, हे सांगून कदाचित आश्चर्य वाटेल. तटबंदीच्या मजबुतीचा बुरूजांशी अतिशय निकटचा संबंध आहे. सरळ सरळ बांधलेली तटबंदी तोफेच्या गोळयांनी किंवा हत्तीच्या धडकेने पडण्याची शक्यता असते, पण बुरूजांच्या अर्धगोलाकृती बांधणीमुळे त्यांची मजबुती फारच वाढते. संरक्षणाच्या दृष्टिनेही बुरूज मोठी कामगिरी बजावू शकत.

Ø गोमुख बांधणी
प्रवेशद्वाराची ‘गोमुख’ बांधणी हे शिवनिर्मित दुर्गांचं आणखी एक वैशिष्टय| गडावरच्या मुख्य भागापासून बरेच दूरवर, खाली प्रवेशद्वार बांधणे, म्हणजे गोमुख बांधणी. बालेकिल्ल्यापासून रायगडचं महाद्वार हे कमीत कमी ४०० फुट खाली आहे. मंदिराच्या गाभारयातून अभिषेकाचे पाणी बाहेर येण्यासाठी, मंदिराच्या मागे खालच्या बाजूला ‘गोमुख’ असते. या गोमुखातून गाभाऱ्यात प्रवेश मिळवणं जितक कठीण, तितकच महाद्वारातून बालेकिल्ल्यापर्यंत पोहचणे मुष्किल आहे. ‘अन्नाचा पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने रायगड सगळया जगाविरूद्ध समर्थपणे लढु शकेल’, हा टॉमस निकल्सचा अभिप्राय रायगडची बांधणी पाहूनच, व्यक्त केला गेला आहे. इंग्रजांनी रायगडला पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हटले आहे, तेही एवढयासाठी.

रायगडवरील माझ्या वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी की, गडावरच्या सगळयाच म्हणजे जवळ जवळ ३५० वास्तुबांधणीमध्ये काहीना काही तरी विशेष दृष्टिकोन आहे. वास्तुशास्त्रीय दृष्टया शिवदुर्गांचा किंवा एकटया रायगडचा ही अभ्यास करणं, हे प्रचंड कार्य आहे, पण ते होणं अतिशय आवश्यक आहे. वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांनी या कार्यात लक्ष घातल्यास एक नवी दिशा शिवचरित्र अभ्यासकांना मिळू शकेल. रायगडच्या मी केलेल्या अभ्यासापैकी काही महत्वाचे मुद्दे या लेखाद्वारे मांडण्याचा माझा प्रयन्त आहे.

Ø “चमत्कार”
गडावरच्या वास्तव्यात, मला राजदरबारात अनेक चमत्कार असल्याचं सांगण्यात आलं. उदाहरणादाखल सांगायच तर अंस की, रायगडच्या पूर्वेला तोरणा किल्ला आहे जेथून महाराजांनी स्वराज्याचे पहीले तोरण बांधले आणि राजगड किल्ला स्वराज्याची पहीली राजधानी यांच्या मधुन उगवणाऱ्या सूर्याची प्रभात किरणं नगारखाण्याच्या कमानीतून येऊन, सिंहासनाच्या जागेवर पडतात. मला मोठ आश्चर्य वाटलं. तसेच माझी उत्सुकता, जिज्ञासा देखिल चाळवली गेली आणि मी विचार करू लागलो ‘हे खरचं शक्य आहे का?’ विचारांती, हे शक्य आहे असे वाटले, पण मग ही काव्यात्मकता, वास्तुशास्त्रीय माध्यमातून साधनारा महाराजांचा वास्तुशास्त्रज्ञ कोण, त्याने ही रचना कशी साधली, हा विचार अस्वस्थ करू लागला. सुदैवाने जगदीश्वराच्या प्रासादातील एका भिंतीवर शिलालेख आढळला. त्याचा अभ्यासकांनी दिलेला अर्थ पुढीलप्रमाणे ‘१५९६ शके आनंद नाम संवत्सराची ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या राज ज्योतिषांनी काढलेल्या किर्तीमान मुहूर्तावर, जो छत्रपती शिवनृपती सिंहासनाधिष्ठित झाला, त्याच्या अनुज्ञेने जगाला आनंद देणारा, हा जगदिश्वराचा प्रासाद ‘हिराजीने’ अनेक तळी, विहीरी, रम्य वनश्री, कुंभीगृहे राजप्रासाद, स्तंभ मिनार इत्यादिंनी मडित असलेल्या, वाणीला अवर्ण्य अशा श्रीमंत रायगडावर निर्माण केला. जोवर आकाशात चंद्र सुर्य नांदतील तोवर हा नांदत राहो.’
शिलालेखाची आणखी एक छोटीशी ओळ एका पायरीवर आहे ‘सेवेचे कार्य तत्पर हिराजी इंदुलकर’ म्हणजे रायगडवरील वर दिलेल्या यादीतील, सगळं बांधकाम हिराजींनी एकतर नवीन बांधले किंवा आधी होतं, त्याला राजधानीच्या दृष्टिने नवीन रूप दिले.
सुर्योदयासंबंधी हिरोजी इंदुलकारांनी केलेल्या, या रचनेची मी आधुनिक वास्तुशास्त्राच्या तत्वाप्रमाणे चिकित्सा केली आणि शिवकाली अशाप्रकारचे प्रगत वास्तुशिल्प साकार करणाऱ्या इंदुलकरांबद्दलच्या अभिमानाने ऊर भरून आला.
सुर्य हा उत्तरायण व दक्षिणायन असा वर्षभर फिरत असतो. त्यामुळे इंदुलकरांनी केलेली ही रचना, वर्षभरासाठी असू शकत नाही, हे सहज लक्षात येते. मग वर्षभरातले हे आश्चर्य साकार होणारे नेमके दिवस कोणते? हे ठरवण्याच्या मागे मी लागलो. त्यासाठी दरबार, नगारखाना व राजगड तोरणा यांचा दिशात्मक अभ्यास केला. दरबारात नगारखान्यापासून सिंहासनाची जागा १९० फूट लांब आहे. सिंहासनाच्या जागेची जमीनपासूनची उंची कामीत कमी ६ फूट आहे. नगारखान्याच्या कमानिची उंची १९ फूट तर रूंदी ९ फूट आहे. एखाद्या ठिकाणासाठी, सुर्याची स्थिती निश्चित करताना, ‘सोलर पाथ डायग्राम’ हा नकाशा काढतात. हा प्रत्येक अक्षांश रेखांशाने बदलतो रायगडच्या १८ अंश ते १४ अंश उत्तर या स्थितीसाठी असा सगळा अभ्यास केल्यानंतर, मी निष्कर्षाप्रत आलो की, अशी सुर्योदय स्थिती मे चा शेवट आणि जून महीन्याच्या पहील्या आठवडयापर्यंत असू शकते. माझ्या या निष्कर्षाला, आश्चर्यकारक दुजोरा मिळाला तो एका महत्वपूर्ण घटनेचा म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाची ती तारीख होती.

नगारखान्याच्या प्रवेशद्वाराची उंची ठरवताना, अंबारीसहीत हत्ती आत येऊ शकेल अशी व्यव्स्था केली होती वगैरे बरीच माहीती आपल्याला ठाऊक आहे. पण फक्त तेवढयाच कारणामुळें प्रवेशद्वाराची उंची १९ फूट ठेवली नसून, वर सांगीतल्याप्रमाणे सुर्याची किरणं सिंहासनापर्यंत पोहचू शकतील, अशा बेताने ती ठेवली आहे. हेही लक्षात घेतले पाहीजे.

Ø आवजाचे रहस्य
राजदरबारासंबंधी मला कळलेला दुसरा चमत्कार असा, की सिंहासनाच्या जागेपासून कितीही हळू आवाजात बोलल्यानंतर तो आवाज संपूर्ण दरबारात स्पष्टपणे एकू येतो. याची सत्यता पडताळून बघण्यासाठी, मी सिंहासनाच्या जागी उभा राहीलो आणि आमच्यापैकी एका सहकारयाला, नगारखान्याच्यवर जाऊन, आगपेटीची काडी पेटवण्यास सांगीतले. आणि खरोखरच मला आश्चर्याचा धक्का बसला| कारण नगारखान्यापासून सिंहासनाचे अंतर १९० फूट आहे आणि तरीही आवाज स्पष्टपणे ऐकू आला. मग या चमत्काराला वैज्ञानिक चिकित्सेच्या साहाय्याने उकलण्याचा प्रयन्त मी केला. तो असा...
दरबाराची दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे. सिंहासनाच्या जागेपासून २१ फूटांवर असलेली १२ फूट उंचीची भिंत बांधून, ही विभागणी केलेली आहे. १९० २१० फूट जागा असलेला दरबार १ फूट जाडीच्या दगडी भिंतीने बंदिस्त केलेला आहे. तिनीही बाजूच्या दगडी भिंतींची उंची १६ फूट आहे. रायगडवर वारा वेगात वहात असल्याकारणाने, या भिंती इतक्या उंच बांधल्या आहेत. या भिंतींची पडझड झाली, तर आवाजाच्या चमत्काराला अडथळा येईल. बंदिस्त जागेमध्ये आवाज घुमतो किंवा अस्पष्ट ऐकु येतो.ह्याच प्रमुख कारण म्हणजे, बाजूच्या भिंतीवरून आवाजाचे होणारे परावर्तन आणि छताच्या पृष्ठभागामूळे होणारे परावर्तन. दरबारातील अवशेषांवरून सिंहासनाची जागा वगळता, दरबाराच्या मोठया भागाला छत असू शकेल, असा कुठलाही पूरावा नाही. दरबार भरवताना आवश्यक तेंव्हा कापडाचा शामियाना घालत असावेत असे माझे मत आहे. आवाजाच्या चमत्काराचं प्रमुख कारण म्हणजे, सिंहासनाच्या जागेला, दरबारापासून वेगळ करणारी भिंत. सिंहासनाच्या सरळ रेषेत, या भिंतीमध्ये २४ फूट रूंद ओपनींग आहे. सिंहासनाची जागा जमिनीपासून कमीत कमी ६ फूटांवर होती| या सगळया एकंदर रचनेमूळे बाजूच्या भिंतीवर जाणारा आवाज अडवला जातो आणि दरबारातल्या ८० टक्के जागेवर पोहचणारा आवाज हा ‘डायरेक्ट ऍकॉस्टिकल रेंज’ मुळे येतो आणि म्हणूनच आवाज आपेक्षेपेक्षा जास्त स्पष्ट येतो. सिंहासनाची जागा आणि त्याची उंची अशी ठेवली आहे की, दरबारात कुठेही बोललेल्या व निर्माण केलेल्या आवाजाचा ‘ऍकॉस्टिकल फोकस’ सिंहासनाच्या जागी तयार होतो| त्यामुळे दरबारात कुणीही बोलले, तरी महाराजांना ऐकू जात असे.



Ø खिडक्यांची रचना
मधल्या भिंतीचे, सिंहासनासमोर आलेल्या ‘ओपनिंग’ मुळे २ भाग झालेले आहेत| त्या प्रत्येक भागात, ६ खिडक्या आहेत. त्यांची रचना उंची, रूंदी फार विचार करून ठरवलेली आहे. या सगळया खिडक्यांची सुरवात (सि लेव्हल) ही सिंहासनाच्या चौथरयापासून सुरू होते आणि दरबारातल्या उरलेल्या २० टक्के जागेवर, आवज पोहचण्याची व्यवस्था, ११ फूट रूंद व २१ फूट उंच खिडक्यांच्या मार्फत आहे, असा निष्कर्ष मी काढला आहे| दरबारात अशा जागी उभा राहीलो की जेथून सिंहासनाकडे बघीतले असता खिडकी मध्ये येत नाही| (त्यामुळे सिंहासन दिसत नाही) तेव्हा लक्षात आले की, असा सगळया जागांवर आवाज अजिबात पोहचत नाही. हा भाग ‘ऍकॉस्टिकल शॅडो’ मध्ये येतो असे म्हणता यईल पण असा भाग संपूर्ण दरबारात ६ ते ८ टक्क्यापेक्षा जास्त नाही.

Ø मनोऱ्यात कारंजे
गंगासागर तलावाला लागून बांधलेल्या मनोऱ्यामध्ये कारंजे असावेत तशा खुणा तिथे दिसतात. द्वादशकोनी असलेल्या या काळया दगडी मनापऱ्यामध्ये, चिरागदाने, शमादानांच्या केसरी प्रकाशात, थुई थुई उडणारे ते कारंजे, शिवकालात किती प्रेक्षणीय दिसत असतील असे विचार मनात आले. आणि लगेच जाणवलं की, त्या काळात ‘वॉटर पंप’ नव्हते. मग मनोऱ्याच्या पायथ्याशी असलेले गंगासागरचे पाणी, ३ ते ४ मजली मनोरयांच्या कारंजामध्ये कसे उडत असेल? आणि मग शोध घ्यायला लागलो. कारंज उडत असायचा त्या जागी वॉटर हेड शोधण्याचा प्रयन्त करता करता, जमीनतले एक छिद्र सापडले.त्या दिशेनी मग मनोऱ्याच्या भिंतीचा शोध केला. सुदैवाने एक मोठा दगड फुटलेला दिसला.त्याठीकाणी असलेल्या छिद्रातून तर चक्क २ इंच व्यासाच्या तांब्याच्या नळीचे दर्शन झाले. पण आश्चर्य असे वाटलं की हा नळ तर रजवाडयाच्या दिशेने वर जात होता. दिशा होती महाराजांच्या स्नानगृहाकडे. म्हणून मी तिकडे गेलो आणि ताबडतोब सगळा उलगडा झाला. महाराजांच्या स्नानगृहावर, पाणी साठवण्याचा हौद साधारण १२ फूट उंचीवर असावा.त्या हौदात गंगासागराचं पाणी पाणक्याच्या सहाय्याने काचडी भरून वर आणून साठवीत असावेत आणि त्या हौदातून ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पाणी मनोऱ्याच्या तीनही मजल्यावरच्या कारंजात उडत असावेत. मनोऱ्याच्या तळमजल्यापासून वरच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतची उंची कमी कमी होत जाते.
तसेच कारंजांच्या खडडयाचा घेर देखील तळमजल्यावर जास्त आहे तर वरच्या मजल्यावर कमी कमी होत जातो. या दोन्हीसाठी कारण आहे ते असं की, प्रत्येक मजल्यावरच्या कारंजाच्या वॉटर हेड्सची उंची टाकीतल्या पाण्याच्या पातळीसापेक्ष कमी कमी होत जाते. पाण्याचा जोर तळमजल्यावरच्या कारंजात जास्ती तर वरच्या मजल्यावर कमी कमी होत जातो.



                                                                                               सूरज बबन थोरात















posted under | 0 Comments
Newer Posts Older Posts Home

वाचक

Designed by WebQuest. Powered by Blogger.

सह्याद्रि

Blog Archive

Followers


Recent Comments